Aptas Ayurveda Trust आयोजित “Ayurgrama 2.0” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये आपल्या मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल मधील चतुर्थ वर्षाच्या विध्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कोटमगाव येथे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यासाठी प्राचार्य डॉ. संजय पाटील सर व कायचिकित्सा साहाय्यक प्राध्यापक डॉ. निखिल गुरव, डॉ श्रद्धा आसोपा यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये Reach Ayurveda to Each या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी कोटमगाव सारख्या गावांत आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला.
NCISM च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “पुनर्वसु 2024” या नॅशनल सेमिनारमध्ये दावनगिरी, कर्नाटक येथे विद्यार्थ्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना थोर आयुर्वेद तज्ञ डॉ हरिश पाटणकर सर, डॉ कौस्तुभ उपाध्ये सर व डॉ. प्रसन्न नरसिंह राव सरांच्या उपस्थितीत Aptas Ayurveda Trust टिमच्या हस्ते कौतुकास्पद सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला